esakal | पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे

पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा

वडगाव निंबाळकर ः शालेय जिवनातच लष्करात अधिकारी होउन देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित केले. त्यासाठी कठोर परिश्रम करीत आभ्यासाबरोबर शाररीक तंदुरूस्तीकडे लक्ष दिले यासाठी आई-वडिलांची साथ मिळाल्याने ध्येय गाठण्यात यश मिळाले. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथिल मुकुल इंगळे सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रूजू झाले. उत्तराखंडमधील डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अॅकेडमीच्या 148 व्या तुकडीचा दिक्षांन्त संचालन समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये देशभरातील 341 तर मित्र राष्ट्रातील 84 तरूणांनी प्रशिक्षण पुर्ण करून अधिकारी पदावर रूजु झाले. यामध्ये मुकुल इंगळे यांचा समावेश होता.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांत केवळ ५०२ रुग्ण

घरात लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नाही. बारामती येथील कै. विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. येथे आयोजित व्याख्यानातून देशसेवेची स्फुर्ती मिळाली. जिद्द कायम ठेउन आभ्यास केला. शाररीक तंदुरूस्तीकडे लक्ष दिल्याने बास्केट बॉलचा स्टेट लेवल खेळाडू झाले. अकरावी बारावी महाराष्ट्र शासनाच्या सर्वीसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (एसपीआय) औरंगाबाद येथे केली. त्यानंतर युपीएससीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची नॅशनल डिफेंन्स अकॅडमी (एनडीए) खडकवासला येथे निवड झाली येथे तिन वर्ष आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडुन येथे एक वर्ष खडतर प्रशिक्षण पुर्ण करून लेफ्टनंट पदी निवड झाली. सद्या मुकुल सुट्टीसाठी कोऱ्हाळे येथे आपल्या घरी आले आहेत. त्यांची जम्मू येथे नेमणूक झाली आहे. वडील डॉ. नितीन इंगळे वैद्यकीय व्यवसायात आहेत तर आई योगीता गृहीणी आहे.

हेही वाचा: जळगावहून लवकरच पुणे, इंदूरसाठी विमानसेवा

प्रेरणादायी विचार तरूणांच्यात बदल घडवतात. याला कृतीची जोड मिळाली की यश गाठता येते. मला देशसेवेची मिळालेल्या संधीमुळे माझे जिवन सफल झाले. आता मी फक्त देशसेवेसाठी वाहून घेउन कार्य करणार

-मुकुल इंगळे, लेफ्टनंट.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात अडीच हजार दिव्यांगांचे झाले कोरोना लसीकरण

loading image
go to top