Traffic Issue : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी; प्रवाशी, वाहनचालक यांना मनस्ताप

नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज सायंकाळी वाहतूकीची कोंडी झाल्याने प्रवाशी, वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागला.
Traffic Issue in Narayangav
Traffic Issue in NarayangavSakal
Summary

नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज सायंकाळी वाहतूकीची कोंडी झाल्याने प्रवाशी, वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागला.

नारायणगाव - येथील पुणे-नाशिक महामार्गावर आज सायंकाळी वाहतूकीची कोंडी झाल्याने प्रवाशी, वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागला. येथील पुणे-नाशिक महामार्गाला बाह्यवळण रस्ता काढण्यात आला आहे. मात्र नारायणगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूकीची कोंडीची समस्या सुटली नाही.

आज दुपारनंतर नारायणगाव शहराला जोडणारे पुणे-नाशिक महामार्गावरील बसस्थानक चौक, कोल्हेमळा रस्ता, बाजारपेठ -जुन्नर रस्ता, खोडद रस्ता या भागात वाहतूकीची कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ झाली. जोपर्यत पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक ग्रामपंचायत एकत्र येऊन ठोस उपाययोजना व कारवाई करत नाही, तोपर्यत वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही.

वाहतूकीची कोंडीची करणे -

  • दोन ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करून होणारी धोकादायक ऊस वाहतूक

  • महामार्गलगत नो पार्किंग झोनमध्ये चारचाकी व दुचाकींची पार्किंग

  • महामार्गलगत वाढलेली अतिक्रमणे

  • मागील काही वर्षात वाहनांच्या संख्येत झालेली विक्रमी वाढ

  • अतिक्रमणामुळे होणारा वाहतुकीस अडथळा

  • वाहतूक नियमांचे उल्लंघन

  • पोलिसांचे कारवाई बाबत बोटचेपे धोरण

  • अतिक्रमण धारकांना राजकिय आश्रय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com