रणरागिणी उतरल्या वाहतूक नियंत्रणासाठी...

pune-nashik
pune-nashik

कडूस (पुणे) : सणासुदीच्या दिवसांत राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे; परंतु यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी राजगुरुनगरवासीयांना मात्र काहीसे आशादायक चित्र दिसले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला तालुका महिला दक्षता समितीतील सदस्यांनी महामार्गावर उभे राहून वाहतूक नियंत्रक स्वयंसेवकांची भूमिका बजावल्याने महामार्गावरील वाहतूक दिवसभर सुरळीत राहिली. 


पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे पाबळ चौक ते मार्केट यार्ड परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. एसटी स्टॅंडसमोरच्या ओढ्यावरील अरुंद पूल, पुलाच्या एक बाजूला वाडा; तर दुसऱ्या बाजूला पाबळ गावाकडे जाणारा जोडरस्ता; त्यात एसटी स्टॅंडमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या एसटी बसमुळे वाहतूक कोंडी होत असते. सणासुदीच्या दिवशी तर या कोंडीत मोठी भर पडते; परंतु यंदाच्या रक्षाबंधन सणाच्या दिवशी मात्र महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली.

वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला नाही. सणाच्या दिवशी होणारा वाहतूक कोंडीचा प्रकार लक्षात घेता, खेडचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महिला दक्षता व सुरक्षा समितीच्या सदस्या सुरेखा कड, मोहिनी राक्षे, सुप्रिया मुळूक, संगीता तनपुरे, ज्योती जाधव, सुनंदा गायकवाड, अलका शिंदे, सीमा बोंबले यांनी वाहतूक नियंत्रक पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com