esakal | पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीचे काम सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीचे काम सुरू

 पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे दुरूस्तीचे काम तसेच महामार्गाचे अनेक ठिकाणी बंद असलेले काम सुरू करण्यात आले आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीचे काम सुरू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळेफाटा : पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे दुरूस्तीचे काम तसेच महामार्गाचे अनेक ठिकाणी बंद असलेले काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी या ठिकाणी असलेला टोल (ता. १ रोजी) चालू करण्यात येणार होता. परंतू शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महामार्गाची कामे अर्धवट असताना पुन्हा एकदा हा टोलनाका सुरू केला जाणार होता यासंदर्भात पत्र पुणे नाशिक महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह आणि प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना दिले होते.

तसेच तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे व युवा नेते अमित बेनके यांनीही या रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत टोल चालू करू देणार नाही असे सांगीतले. तसेच हा टोल बंद केला. हा महामार्ग कित्येक ठिकाणी उखडला असून, अनेक  ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. पुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

दरम्यान या संदर्भाची बातमी 'सकाळ' (ता. २) अंकात प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिध्द झाल्यावर टोल प्रशासकीय विभागाने या बातमीची दखल घेत पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा ते नारायणगाव पर्यत ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, ते दुरूस्तीचे काम चालू केले आहे. पिंपळवंडी व नगर-कल्याण या महामार्गावरील आळेफाटा येथील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुलाचे काम देखील सुरू झाले आहे.

loading image