

Banks Shut Down for Lunch Break
Sakal
पुणे : जेवणाची वेळ झाली आहे, नंतर या....एक तास बँक बंद आहे.... असे तुम्हा अनेकांना दुपारी एक ते तीनदरम्यान बँकेत गेल्यावर ऐकायला मिळते. राष्ट्रीय बँकांवर नागरिकांचा विश्वास आहे. मात्र, काही बँका जेवणासाठी बंद राहात असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. ही बँकिंग सेवा अधिकाधिक लोकांच्या उपयोगी पडावी, या हेतूने 'सकाळ'ने बँकांची पाहणी केली. त्यात दुपारच्या वेळेत शेकडो नागरिक बँकेत येऊन ताटकळत उभे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.