

पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मृतांमध्ये धायरीतील एका कुटुंबातील ३ जणांचा त्यांच्या मित्राचा आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. इतर मृतांमध्ये कंटेनर ड्रायव्हर, क्लिनर आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.