esakal | पुणे : भाजपचे लक्ष केवळ मंत्रालयातील खुर्चीवर; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : भाजपचे लक्ष केवळ मंत्रालयातील खुर्चीवर; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

'महाराष्ट्रद्रोही भाजप' नेत्यांची 'महाराष्ट्र बचाव' ही घोषणा केवळ फार्स आहे, अशी तिखट टीका काँग्रेस, राष्ट्रवादीने केली. 

पुणे : भाजपचे लक्ष केवळ मंत्रालयातील खुर्चीवर; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात 'कोरोना'चे गंभीर संकट असताना भाजपला राजकारण करायचे सुचत आहे. त्यांचे लक्ष रुग्णालयील रुग्णांकडे नसून, मंत्रालयाची खुर्चीवर आहे. 'महाराष्ट्रद्रोही भाजप' नेत्यांची 'महाराष्ट्र बचाव' ही घोषणा केवळ फार्स आहे, अशी तिखट टीका काँग्रेस, राष्ट्रवादीने केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुक्रवारी (ता. 22) सकाळी भाजपतर्फे महाविकासआघाडी सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. त्यावर सत्ताधारी पक्षांनीही जोरदार उत्तर दिले. कोरोनाचा सामना आपण एकजुटीने करू, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. परंतु, कृती मात्र त्याविरोधात करत आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी अधिकाधिक फायदा मिळवून देण्यात भाजप अपयश ठरला आहे. राज्य सरकारच्या कामात काही चुका असतील, तर त्या सुधारता येऊ शकतात. पण भाजपचे नेते सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहाण्यातच अधिक स्वारस्य घेत आहे. भाजपने आपला निधी मुख्यमंत्री फंडाऐवजी पंतप्रधान फंडाला दिला, यातच त्यांचा महाराष्ट्रद्रोह दिसून येतो. अशा महाराष्ट्रद्रोही नेत्यांचे हे आंदोलन केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 
आमदार अनंत गाडगीळ म्हणाले, "देश संकटात असतांना सरकारच्यामागे उभे राहायचे ही भूमिका त्यावेळी अटल बिहारी बाजपेयी यांनी घेतली होती. आता देशात कोरोनाने हाहाःकार माजवला असतांना मदती ऐवजी भाजपाला आंदोलन करावे लागत आहे. ही भूमिका बेजबाबदारपणाची व हृदयशून्य आहे.  भाजपची सध्याची स्थिती "ने मजसि ने परत मंत्रालयाला, भले रुग्णाचा प्राण तळमळला" अशी आहे, अशी बोचरी टीका गाडगीळ यांनी केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणारे कुठे ते १०५ हुतात्मे आणि कुठे हे १०५ अतृप्त आत्मे अशी उपरोधीक टीकाही गाडगीळांनी केली." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोरोना'च्या काळात राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे आता मोदींचेही ऐकत नाहीत इतके अट्टल झाले आहेत. राज्य सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे,  अशा काळात विरोधीपक्षानेही सहकार्य केले पाहिजे. पण भाजपने राजकारण सुरू केले. मात्र यास जनतेचा  पाठिंबा नाही. सोशल मीडियावर भाजप नेते ट्रोल होत आहेत." 


चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयापुढे शिवसेनेचे आंदोलन

भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले जात असल्याने व महाराष्ट्र बचाव आंदोलनास प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने कोथरूड येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी माजी नगरसेवक श्याम  देशपांडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.