अजित पवारांच्या बंडामुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम

Ajit-Pawar
Ajit-Pawar

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकविल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक आहेत. त्यापैकी काही नगरसेवक हे अजित पवारांच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत, तर काही ज्येष्ठ नगरसेवक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. परंतु, सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल उघडपणे बोलण्यास टाळत आहेत.
राज्यात सत्तास्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यात एकमत झाल्याचे चित्र आहे.

सरकार स्थापनेचा मुहूर्त जाहीर होण्याची शक्‍यता असताना शनिवारी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राज्यात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहर, जिल्हा आणि राष्ट्रवादीच्या गोटात संभ्रम निर्माण झाला. त्याचवेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी बंड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
विद्यमान ४२ पैकी काही नगरसेवक दादांच्या पुढच्या निर्णयानंतरच बोलू, अशी भूमिका घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com