'गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से' (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी व आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केलीत.

पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे.

महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी व आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केलीत. 'गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से', 'यह सरकार निकम्मी है, यह सरकार बदलनी है', 'एक रुपय्या चांदी का, सारा देश गांधी का', 'तख्त बदलदो, ताज बदलदो, गद्दारों का राज बदलदो', 'अण्णा आप संघर्ष करो, हम आपके साथ है', 'नही चलेगी..नही चलेगी, तानाशाही नही चलेगी' अशी निदर्शने करत राष्ट्रवादी काँग्रेसने अण्णांच्या मागण्यांना पुर्ण करण्याची मागणी केली.

अण्णा व मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू - 
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह राळेगणसिद्धी येथे दुपारी दोनच्या सुमारास पोचले. ते बंद खोलीत वरील प्रश्न बाबत चर्चा करत आहेत. त्यांच्या समवेत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, शिवकुमार शर्मा, पोपटराव पवार हेही उपस्थित होते. यावेळी लोकपाल व लोकायुक्त नेमणूक, कृषिमूल्य आयोग व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहेत. ती समाधानकारक झाली, तर हजारे यांचे उपोषणावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर हजारे उपोषण सोडतील, अशी माहिती समजली. अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

Web Title: pune ncp supports anna hajares hunger strike