Pune
Punesakal

Pune : गंगा धाम शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील काकडे वस्ती शेजारील बावीस गोदामे आगीत जळून खाक

डोंगर उताराचा भाग असल्यामुळे येथे शंभर पेक्षा जास्त अनाधिकृत गोदामे आहे.

Pune - गंगाधाम शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील काकडे वस्ती शेजारील गोदामांना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, आगीमध्ये विविध प्रकारच्या साहित्यांची बावीस गोदामे जळून खाक झाली.

पीएमआरडीए व महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या शंभर पेक्षा जास्त जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यासाठी बावीस बंब, दहा टँकर व तीन जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला.

Pune
Pune: किल्ले राजगडच्या पायथ्याशी आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

पेंट, केमिकल, फर्निचर, डेकोरेटीव वस्तू, काचा, स्पेअर्स पार्ट, बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग, ट्रान्सपोर्ट, मांडव आदीचे गोडाऊन होते. शेजारी वस्ती आहे वस्ती पर्यंत आग पोहचली नाही, गोदामां शेजारी ट्रान्सपोर्टचे पंचवीस ट्रक उभे होते, आगी पासून ट्रक वाचविण्यात आले सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही परंतु कोट्यावधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबवेवाडी, कोंढवा आणि मार्केट यार्ड परिसरातून धुराचे लोट सहज दिसत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे गंगाधम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून एका बाजूची वाहतूक बंद केली होती.

Pune
Mumbai News : लोकल ट्रेन रुळावरून घसरली! कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी सेवा विस्कळीत

देवेंद्र पोटफोडे ( अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे ) : १५ अधिकारी व १०० जवानांनी आग विझवण्याचे काम केले आहे, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी अथवा जिवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

विक्रम क्षीरसागर ( कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग ) : सदरील गोदामे अधिकृत किंवा अनधिकृत आहेत याची माहिती घेऊन अनाधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात येईल.

Pune
Mumbai : पीओपी गणेशमुर्ती बंदीला भाजपचा विरोध

अनाधिकृत गोदामे

बिबवेवाडी, कोंढवा येवलेवाडी व वानवडी क्षेत्रीय कार्यालयांची हद्द या परिसरात येते, डोंगर माथा डोंगर उताराचा भाग असल्यामुळे येथे शंभर पेक्षा जास्त अनाधिकृत गोदामे आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने अनेक वेळा कारवाई करून गोदामे पाडले परंतु पुन्हा गोदामे तयार होत आहे, त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी, अपघात होत असतात, या परिसरात गोदामांना आग लागण्याची तीन वर्षांत चौथी घटना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com