नेहरू यांच्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका : चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयडिया ऑफ इंडिया

नेहरू यांच्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका : चव्हाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला खंडप्राय: देश एकसंध राहणार नाही. देशात लोकशाही टिकणार नाही, असा विश्वास जगातील अनेक नेत्यांना होता. परंतु ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या संकल्पनेतून आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया नेहरूंनीच घातला. नेहरूंच्या आयडिया ऑफ इंडियाला आज धोका निर्माण झाला आहे’’ असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘पंडित नेहरूंच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन’चे उदघाटन रविवारी चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, नीता रजपूत, कमल व्यवहारे, इंटकचे सुनील शिंदे, आदी आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदर्शनाचे आयोजन प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि बागवे यांनी केले.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

नेहरूंच्या ‘आयडिया ऑफ इंडियामुळे’च देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, ‘‘विज्ञानाधिष्ठित समाज निर्मिती करण्यासाठी नेहरूंनी प्रयोगशाळा सुरू केल्या. सीएसआयआर औद्योगिक संशोधन परिषदेसारखी सोसायटी निर्माण केली. तिचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून ते १७ वर्षे देशातील सायन्स काँग्रेसला हजर राहून वैज्ञानिकांशी संवाद साधत असत. त्यांनीच आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था निर्माण केल्या. त्यांनी डिसकव्हरीऑफ इंडिया, ग्लिम्स ऑफ वर्ल्ड सारखी पुस्तके लिहून साहित्य निर्मिती केली. त्यांनी उदात्त विचार आणि ध्येय ठेवून वाटचाल केली. प्रत्येक देशवासीसाने पंडितजींच्या विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.’’

छाजेड यांनी प्रास्ताविक केले, तर व्यवहारे यांनी आभार केले. या प्रदर्शनात पंडित नेहरूंच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे लावलेली आहेत. देशात पहिल्यांदा १९५१ साली आशियायी क्रीडा स्पर्धा नेहरूंना घेतल्या, पुण्यात पूराच्यावेळी दिलेली भेट, शनिवारपेठेतील गाडगीळ वाड्यात नेहरूंच्या उपस्थितीत झालेली बैठक, युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर युद्धभूमीवरील सैनिकांची घेतलेली भेट, असे अनेक प्रसंग या प्रदर्शनातून उलगडतात. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता.१५) नागरिकांसाठी सणस मैदाना समोरील बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

loading image
go to top