Pune : CA साठी नवे मूल्यमापन, आर्टिकलशीपचा कालावधी दोन वर्षांवर; नवीन शैक्षणिक धोरण

अंतिम वर्षाच्या परीक्षेत अनिवार्य मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडी पेपर जोडण्यात आला आहे. नवीन योजनेअंतर्गत, मध्यवर्ती आणि अंतिम स्तरावर प्रत्येक विषयातील ३० गुणांसाठी केस आधारित बहुपर्यायी प्रश्नांद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे.
Pune
Pune sakal

Pune - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या(एनईपी) पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीतही बदल होऊ घातले आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) यासाठी नवीन शिक्षण आणि प्रशिक्षणाची योजना तयार केली आहे. ज्यानुसार अंतिम परीक्षेपूर्वी आर्टिकलशीपचा कालावधी तीन वर्षांवरून दोन वर्षांवर आणण्यात आला आहे. एक जुलैपासून ही नवी प्रणाली राबविण्यात येणार आहे.

Pune
Mumbai News : पांडुरंगाच्या दर्शनासाठी डबेवाल्यांनी घेतली एक दिवसाची सुट्टी; शुक्रवारी सेवा बंद

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके आणि एनईपीनुसार आवश्यक बदलांची माहिती देणारे परिपत्रक आयसीएआयने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. नवीन योजनेत पूर्वीपेक्षा अधिक तंत्रज्ञान मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेत अनिवार्य मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडी पेपर जोडण्यात आला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षेत अनिवार्य मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडी पेपर जोडण्यात आला आहे. नवीन योजनेअंतर्गत, मध्यवर्ती आणि अंतिम स्तरावर प्रत्येक विषयातील ३० गुणांसाठी केस आधारित बहुपर्यायी प्रश्नांद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. याशिवाय केस स्टडी पेपरमधील अनिवार्य भागा अंतर्गत विद्यार्थ्याच्या उच्च स्तरीय कौशल्यांचे आणि व्यावसायिक क्षमतेचे मूल्यांकन केले जाणार आहे.

Pune
Pune Crime : टेम्पोसह 56 लाखाचा गुटखा पकडला, जिल्हा गुन्हेशाखा व राजगड पोलिसांची कारवाई

‘सीए’चे वेळापत्रक...

- सध्याच्या योजनेनुसार फाउंडेशन अभ्यासक्रमाचे प्रवेश - १ जुलै

- सध्याच्या योजनेनुसार इंटरमिजीटएट आणि फायनल कोर्सची अंतिम मुदत - ३० जून

- नवीन योजनेअंतर्गत फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी - २ ऑगस्ट

- नवीन योजनेअंतर्गत इंटरमिजिएट आणि फायनल अभ्यासक्रमांची नोंदणी - १ जुलै

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://www.icai.org

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com