

Rs 4,427 Crore Remittance Case; FIR Filed Against 2 Chartered Accountants
eSakal
Pune 4427 crore 2 CA case: पुण्यात परदेशी रेमिटन्स व्यवहारांप्रकरणी एक नवे प्रकरण उघडकीस आले असून तब्बल 4,427 कोटी रुपयांच्या व्यवहारांप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. करचुकवेगिरी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवरून दोन चार्टर्ड अकाउंटंट्ससह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तीन कंपन्या कथितरित्या बनावट किंवा केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्था असल्याचा संशय आहे.