पुणे-नाशिक मार्गावर आता चौथा टोल नाका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पुणे - पुण्याहून नाशिकला जाताना सिन्नर ते नाशिक रोड दरम्यान शिंदे गावाजवळ नवीन टोल नाका सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे हद्दीत दोन टोल नाके सुरू झाले आहेत. आता एकूण चार ठिकाणी टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांना नाशिकला जाताना टोल मोजावा लागणार आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) पुणे- नाशिक मार्गावर खेड ते सिन्नर या दरम्यान महामार्गाचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. पुणे- नाशिक महामार्गाचे काम खेड ते सिन्नर आणि सिन्नर ते नाशिक रोड या दोन टप्प्यांत केले जात आहे. खेड ते सिन्नर दरम्यान चाळकवाडी (ता. जुन्नर) आणि हिरगाव पावसा (ता. संगमनेर) येथे दोन टोल नाके फेब्रुवारीत केले होते. तसेच, याच मार्गावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मोशी टोल नाक्‍यावर यापूर्वीपासूनच टोल आकारणी केली जात आहे. त्यामुळे चालकांना तीन ठिकाणी टोल द्यावा लागत होता. आता त्यात शिंदे टोल नाक्‍याची भर पडली आहे. आळेफाट्यापासून नारायणगाव, मंचर आणि खेड या ठिकाणी बायपासची कामे अपूर्ण आहेत. खेड ते सिन्नर व सिन्नर ते नाशिक रोड या रस्त्याचे काम अपूर्ण असूनही टोल आकारणीस सुरवात केली जाणार आहे.

Web Title: pune news 4th toll naka on pune-nashik highway