जुनी सांगवीतील स्मशानभुमीच्या नुतनिकरणाचे काम गतीने करावे

रमेश मोरे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पिंपरी चिंचवड शहर व सांगवी प्रभागातील निवडणुक काळात सांगवीची शवदाहीनी हा कळीचा मुद्दा बनला होता.याच विषयाला लावुन अनेक आरोप प्रत्यारोप याबाबत झाले होते.शवदाहीनी खरेदीपासुन ते ठेकेदारांपर्यंत अनेक खरेदीच्या रकमेच्या तफावतीबाबत संपुर्ण शहरात हा मुद्दा चर्चीला जात होता

जुनी सांगवी - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभुमीचे काम सध्या संथ गतीने होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना अंत्यविधी व ईतर धार्मिक विधी करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या स्मशानभुमी जवळच पिंपरी चिंचवड शहरातील पहिली पर्यावरणपुरक गॅस शवदाहीनी येथे आहे. मात्र ही शवदाहीनी असुन अडचण नसुन खोळंबा, याच स्थितित आजवर कधी सुरू तर कधी महिना महिना बंद राहिलेली आहे. परिणामी सांगवी परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी शवदाहीनीच्या गैरसोयीमुळे ईतरत्र जावे लागले आहे. स्म

शान भुमीचे संथ गतीने सुरू असलेले काम गतीने पुर्ण करून गँस शवदाहीनीची परिस्थिती सुधारण्यात यावी याबाबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील ही पहिली  पर्यावरण पुरक गँस शवदाहीनी आहे. निवडणुकीपुर्वी केवळ राजकारणापोटी व सत्तेसाठी आरोप करत या शवदाहीनीचे राजकारण करण्यात आले. मात्र सत्ताबदलानंतरही सत्ताधारी मंडळी व पालिका प्रशासनाने येथील गैरसोयी बाबत आजवर कुठलीही सक्षम उपाय योजना न करता जैसे थे परिस्थितीत ही शवदाहीनी कधी सुरू तर कधी महिना महिना बंद ठेवण्यात येत आहे. यातुन सत्ताधा-याचा नाकर्तेपणा यातुन समोर येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहर व सांगवी प्रभागातील निवडणुक काळात सांगवीची शवदाहीनी हा कळीचा मुद्दा बनला होता.याच विषयाला लावुन अनेक आरोप प्रत्यारोप याबाबत झाले होते.शवदाहीनी खरेदीपासुन ते ठेकेदारांपर्यंत अनेक खरेदीच्या रकमेच्या तफावतीबाबत संपुर्ण शहरात हा मुद्दा चर्चीला जात होता. अनेक मुद्यांपैकी  या प्रभागातील सत्तांतर घडण्याते निमित्त गॅस शवदाहीनीचे कारण असल्याचे मत नागरीकांमधुन बोलले जाते.

सत्ताबदलानंतरही शवदाहीनी,स्मशानभुमीचे नुतनिकरण,परिसर सुशोभिकरणाचे काम कासव गतीने सुरू असल्याने नागरीकांना  नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने गँस शवदाहीनीची सेवा नियमित द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.याचबरोबर स्मशानभुमीचे काम गतीने पुर्ण करून परिस्थिती सुधारण्यात यावी. सध्याच्या गैरसोयी बद्दल सत्ताधारी मंडळी व प्रशासनाचा नाकर्तेपणा दिसुन येत असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे प्रशांत शितोळे यांनी केला आहे.

Web Title: pune news