Pune News: पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी ९८ कोटी स्थायी समितीकडून मंजूर

PMC: हराच्या विविध भागात पूर स्थिती रोखण्यासाठी कामे केली जाणार आहेत
 पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी ९८ कोटी स्थायी समितीकडून मंजूर
Pune News:sakal

Pune News: शहरात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडालेली असताना प्रशासनावर सडकून टीका केली जात आहे. नाले सफाई न करणे, पावसाळी गटारांची स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे.

असे असताना आज (ता. ११) केंद्र सरकारच्या योजनेतून पुणे शहरा पूर स्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केली जाणार असून, त्या कामाच्या ९७ कोटी ९४ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. यातून शहराच्या विविध भागात पूर स्थिती रोखण्यासाठी कामे केली जाणार आहेत.

 पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी ९८ कोटी स्थायी समितीकडून मंजूर
Pune Rain Updates : पहिल्या दहा दिवसातच सरासरीच्या निम्मा पाऊस; पुणे शहरात सर्वाधिक २०१ मिलिमिटरची नोंद

केंद्र सरकारने अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट (शहरी पूर जोखीम व्यवस्थापन) योजना तयार केली आहे. यामध्ये पुणे, मुंबईसह चेन्नई, कोलकता, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद या सात शहरांचा समावेश असून, या शहरांमध्ये पूर स्थिती रोखण्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची योजना तयार केलेली आहे.

यामध्ये पुणे महापालिकेला पुढील पाच वर्षात २५० कोटी रुपये मिळणार आहेत. महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली आहे. शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी मूलभूत बदलांसह तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पुढील पाच वर्षात १४ व्या आणि १५व्या वित्त आयोगातून पुणे शहराला हा निधी उपलब्ध होईल.

या कामाचे पाच टप्पे असून पहिल्या टप्प्यात पावसाळी गटार टाकणे, काँक्रिट कॅनॉल करणे, भूजल पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, नाला खोलीकरण करणे, डोंगरावर चर खोदून पावसाचे पाणी जिरवणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी १४७ कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते.

 पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी ९८ कोटी स्थायी समितीकडून मंजूर
Pune Rain : पावसाळी वाहिन्या केबलच्या विळख्यात;महापालिका प्रशासनाकडून अखेर कारवाई सुरू

त्याची निविदा मार्च महिन्यातच मान्यतेसाठी ठेवण्यात येणार होती, पण आचारसंहितेपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा प्रस्ताव रखडला होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उठल्यानंतर पहिल्याच बैठकीत प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता दिली.

या कामासाठी मागविलेल्या निविदेत पाटील कंस्ट्रक्शन अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने १६.२१ टक्के कमी दराने निविदा भरली. ही निविदा पात्र ठरल्यानंतर आज स्थायी समितीमध्ये ९७ कोटी ९४ लाख ६९ हजार ८४२ रुपयांची निविदा मान्य झाली आहे.

 पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी ९८ कोटी स्थायी समितीकडून मंजूर
Pune News : दोन PMPML बसमध्ये सापडून कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू; कात्रजमधील घटनेने परिसरात हळहळ

ही होणार कामे

- आराखड्यामध्ये सर्वाधिक जोखीम असलेल्या ६० ठिकाणी उपाययोजना करणार

- शहराच्या विविध भागात ६०० मिमी, ९०० मिमी, १ हजार मिमी व्यासाच्या पावसाळी गटार टाकणार

- १२०० ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज बोअर घेणार

- शहरातील प्रमुख नाले खोल करून पुराचा धोका कमी करणार

- शहरात अनेक टेकड्या आहेत, तेथे चर खोदून पाणी जिरवण्यावर भर देणे

 पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी ९८ कोटी स्थायी समितीकडून मंजूर
Pune News : रस्त्यावरची खडी, माती उचलणार कोण?; क्षेत्रीय कार्यालये, मलनिःस्सारण विभागात हद्दीचा वाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com