आषाढीची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - विठ्ठलवाडी आणि औंध येथील विठ्ठल मंदिरांसह शहराच्या सर्व भागांतील विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी, त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई, दर्शनरांगांची व्यवस्था, सुरक्षिततेपासून प्रसादापर्यंतची सर्व तयारी देवस्थानांनी केली आहे.

शहरातील पासोड्या विठोबा, निवडुंगा विठोबा मंदिर, तुळशीबाग विठ्ठल मंदिर, नगरकर तालमीजवळील झांजले विठ्ठल मंदिरासह उपनगरांमधील विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. मंदिराच्या रंगरंगोटीनंतर वैविध्यपूर्ण पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

विठ्ठलवाडीतील विठ्ठल-रखुमाई मंदिर - मंदिराची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी दोन दर्शनरांगा तयार करण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी देवस्थानतर्फे १४ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. याबरोबरच सिंहगड पोलिस ठाण्यातर्फे पोलिस बंदोबस्त असणार आहे. 

मंदिराचा इतिहास - गोसावी कुटुंबाचे पूर्वज संभाजी गोसावी हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनीच १५ व्या शतकाच्या पूर्वार्धात मुठा नदीच्या काठावर हे मंदिर बांधले. त्यामध्ये विठ्ठल आणि रखुमाईच्या देखण्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. गोसावी यांनी मंदिराजवळच जिवंत समाधी घेतली. काळ्या पाषाणात हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. 

मंदिरातील कार्यक्रम
महापूजा : पहाटे दोन ते चार 
भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले :  पहाटे चार ते मध्यरात्रीपर्यंत
भाविकांची संभावित संख्या : अडीच लाख

औंध विठ्ठल मंदिर - दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. पावसापासून बचावासाठी मंदिर परिसरात मंडप घातला आहे. महिला भजनी मंडळांतर्फे भजन होणार आहे. भाविकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच देवस्थानने सुरक्षिततेसाठीही विशेष व्यवस्था केल्याचे देवस्थानचे विश्‍वस्त राहुल जुनवणे यांनी सांगितले.      

मंदिराचा इतिहास - औंध संस्थानच्या साळुबाई शिंदे व केदारी शिंदे यांनी १७७६ मध्ये मुळा नदीच्या तीरावर विठ्ठल मंदिर बांधले. जुन्या पद्धतीने केलेले दगडी बांधकाम, दीपमाळ अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील विठ्ठलाची देखणी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते.
महापूजा : पहाटे चार वाजता
भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले : पहाटे पाच ते मध्यरात्रीपर्यंत
भाविकांची संभावित संख्या : ५० हजार 

Web Title: pune news aashadhi ekdashi preparation