पाणी उपसा सिंचन योजना कारखाने चालविणार

संतोष आटोळे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कटफळ (ता.बारामती) येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिरसाई उपसा सिंचन योजना, दौंड तालुक्यातील जानाई उपसा सिंचना योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना या संबंधित भागातील जिरायत भागाला वरदान ठरल्या आहेत.

शिर्सुफळ :  बारामती, दौंड व पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या शिरसाई, जानाई व पुरंदर पाणी उपसा सिंचना योजना सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांच्याकडे चालविण्यासाठी देण्यात येणार असुन यासाठी 4 सप्टेंबर रोजी पुणे येथे संबंधित विभागाचे पदाधिकारी, अधिकार यांची बैठक आयोजित केल्याची माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जर हि बैठक यशस्वी झाली तर आगामी काळामध्ये दुरुस्ती किंवा विजबिलाअभावी योजना बंद पडणार नाहित.याचा फायदा या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतीला कायमस्वरुपी सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.

कटफळ (ता.बारामती) येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिरसाई उपसा सिंचन योजना, दौंड तालुक्यातील जानाई उपसा सिंचना योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना या संबंधित भागातील जिरायत भागाला वरदान ठरल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षापासुन या योजनांना ग्रहण लागले असुन विजबिल थकबाकी, दुरुस्तीला निधी या कारणांमुळे या योजना चालु कमी आणि बंद जास्त राहतात यामुळे या योजनांच्या लाभक्षेत्रामध्ये जलसिंचनासह पिण्याच्या पाण्याच्याही टंचाईचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आजही बारामती तालुक्यामध्ये 27 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे यामुळे ज्या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्चुन या योजना उभारण्यात आल्या तो उद्देश पूर्णत्वाला जात नाही.

याचा गांभिर्याने विचारकरुन याप्रश्नावर कामय स्वरुपी तोडगा काढण्यासाठी सदर योजना या सहकारी तसेच खाजगी कारखान्यांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती अँग्रो, व दौंड शुगर या कारखान्यांच्या माध्यमातुन सदर योजना कायम स्वरुपी कार्यन्वित करण्यासाठी चालविण्यासाठी घेण्यात येणार आहे.याबाबत 4 सप्टेंबर रोजी पुणे येथे संबंधित पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे.याबाबत सकात्मक निर्यण झाल्यास या योजना कामयस्वरुपी सुरु ठेवण्याबाबतच्या अडचणी दुर होतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Pune news Ajit Pawar in Shirsuphal