A Pune youth set fire to his electric scooter inside a service center after repeated service delay : एका महिन्याच्या आत ई-स्कुटर खराब झाल्याने तरुणाने सर्व्हिस सेंटरमध्ये जात ती पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. २३ जुलै रोजी कोंढव्यातील सोमजी चौकातील साई सर्व्हिस सेंटरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी साई सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापक जालिंदर विठ्ठल नेवसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चिरायु चंद्रकांत घोणे असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी आता त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.