निळुभाऊ हे मराठी नाट्य, चित्रपट सृष्टीतील लढणारा एक शिलेदार: अशोक सराफ

मिलिंद संधान
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

बर्लिन, लंडनला निळुभाऊंबरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. लंडनमध्येही निळुभाऊंनी पायजमा आणि झब्बा घालुनच आपला प्रवास केला. त्यामुळे त्यांना काही वेळ पोलिसांनी आडवुन धरल्याचे त्यांचे सहकारी मित्र व चित्रपट निर्माता, वात्राटीकार रामदास फुटाणे यांनी सांगताच सभागृहात मोठा हशा पिकला. 

नवी सांगवी : " मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीचा एक लढणारा शिलेदार म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले तथा निळुभाऊ... त्यांनी आपल्या संपुर्ण चित्रपटसृष्टीच्या प्रवासात अभियन म्हणजे काय ? तो कसा करता येतो ? याचा थक्क करणारा अनुभव स्वतःसह सहकाऱ्यांना दिला. " असे उद्गार जेष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांनी पिंपळे गुरव येथे काढले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात त्यांच्या नावाने आयोजित केलेल्या कलामहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार उल्हास पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, एकनाथ पवार, चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, लिलाताई गांधी, सुरेश देशमुख, स्थानिक नगरसेविका माधवी राजापुरे, उषा मुंढे, सीमा चौगुले यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक व अधिकारी वर्ग उपस्थित होता. 

नटसम्राट निळुफुले यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मागच्या महिण्यात केले होते. परंतु अद्याप तेथे कोणताही मोठा कार्यक्रम करण्यात आला नव्हता. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने निळुभाऊंचे चित्रपटांचे आजपासून रविवार पर्यंत आयोजन कला महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. निळुफुलेंचे प्रचंड वाचण व त्यातून त्यांचे राजकारण, समाजवाद, कम्युनिझम, राष्ट्रसेवा दल, कॉग्रेंस, आरएसएस यांच्या बद्दलचे मत यावेळी बहुतांश वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

बर्लिन, लंडनला निळुभाऊंबरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. लंडनमध्येही निळुभाऊंनी पायजमा आणि झब्बा घालुनच आपला प्रवास केला. त्यामुळे त्यांना काही वेळ पोलिसांनी आडवुन धरल्याचे त्यांचे सहकारी मित्र व चित्रपट निर्माता, वात्राटीकार रामदास फुटाणे यांनी सांगताच सभागृहात मोठा हशा पिकला. 

निळुभाऊंच्या नावाने नाट्यगृह खरे तर पुण्यात व्हायला पाहिजे होते यावर भाष्य करताना आमदरा लक्ष्मण जगताप यांनी माईने नाही केले ते मावशीने केले असे सांगितले. पिंपरी चिंचवड शहराचा सर्व बाजुंनी होणारा विकास पाहता पिंपरी चिंचवड शहराची तुलना पुण्याशी न करता मुंबई अथवा लंडनशी केली पाहिजे, असे जगताप यांनी म्हणताच सर्वांनी त्याला टाळ्यांळा कडकडाट करून साथ दिली. 

Web Title: Pune news Ashok Saraf talked about Nilu Phule