जनतेची मानसिकता बदलण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - स्वच्छतेचा संदेश आणि प्रबोधन करण्यासाठी स्वच्छता आणि ग्रामदिंडी काढली जाते. स्वच्छता अभियानामध्ये देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे; परंतु राज्य अद्यापही शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले नाही. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी व्यक्त केले. 

विधानभवन येथे "ग्राम विकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने "संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये "स्वच्छता व ग्राम सभा' दिंडीची सुरवात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे संचालक डॉ. सतीश उमरीकर आदी उपस्थित होते. 

या वेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कुटुंब कल्याण क्षेत्रातील "स्वर्गीय आबासाहेब स्मृती विशेष पुरस्कार' (रुपये 30 हजार) कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत उत्तूर, सामाजिक एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (रुपये 30 हजार) सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत पाडळी, "पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन वसंतराव नाईक' पुरस्कार (रुपये 30 हजार) कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत हेब्बाळ जलद्याल यांना देण्यात आला. विभागस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (रुपये 10 लाख) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील ग्रामपंचायत मान्याची वाडी, द्वितीय पुरस्कार खेड तालुक्‍यातील कानेवाडी आणि तृतीय क्रमांक पुरस्कार (रुपये 6 लाख) सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत अलकुड यांना देण्यात आला. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार यांनी आभार मानले. 

Web Title: pune news babanrao lonikar