बालरंजनमध्ये अवतरली ‘पपेटची दुनिया’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

पुणे - ‘बालरंजन’च्या सभागृहात पोपट, ससा, कासव, मांजर, हत्तीपासून थेट डायनासोरपर्यंत सगळे प्राणी दाखल झाले आणि छोट्या मुलांनी मौज केली. छोटा भीम आणि चुटकी या पात्रांसोबत मुलांना पपेट्‌स हाताळायला मिळाल्याने धम्माल झाली.

बालरंजन केंद्राच्या तिसाव्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम म्हणून चार ते सहा वयोगटातील मुलामुलींसाठी पपेट मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते. ‘बालरंजन’च्या पालक शुभा मराठे यांनी हे शिबिर घेतले. त्यांनी फिंगर पपेट व स्टिक पपेट हे प्रकार दाखविले; मग ‘बमबडी बमबम’ हे गाणे म्हणून घेतले. सर्व प्राण्यांच्या आवाजात बोलायला मिळाल्याने मुले खूष झाली. स्वतःच्या हातात घातलेल्या पपेटचे संवाद आयत्यावेळी स्वतःच्या मनाने बोलताना मुलांनी गम्मत उडवून दिली.
 
Web Title: pune news balranjan Puppet show