बाणेरला सायन्स पार्कचा ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - विज्ञानाचे विविध पैलू मुलांना उलगडून दाखविणारे ‘सायन्स पार्क’ बाणेरमध्ये उभारण्याचा आराखडा पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केला आहे. ‘प्लेसमेकिंग’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वैज्ञानिक खेळ, खेळणी, उपकरणे येथे असतील आणि त्या माध्यमातून येथे मुलांना विज्ञानाचा अभ्यास करता येणार आहे. 

बाणेरच्या सर्व्हे क्रमांक २३ मध्ये सुमारे ९८२ चौरस मीटर क्षेत्रावर सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या पार्कमध्ये सूर्यमालारूपी अँफी थिएटर, पिन होल कॅमेरा, जागतिक घड्याळ, दूरदर्शक, छायाघड्याळ (सनडायल) आदी आकर्षणे असतील. त्यांच्या माध्यमातून मुले विज्ञानाचा अभ्यास सहज करू शकतील. तसेच झोके, घसरगुंडी, सी-सॉ आदी खेळही असतील. 

मिलिंद किर्दत व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ‘प्लेसमेकिंग’ हा उपक्रम राबविला जात आहे. नागरी पुनर्रचनेच्या माध्यमातून रहिवाशांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. 

Web Title: pune news baner science park smart city

टॅग्स