कर्णबधीर व्यक्तींना रविवारी मोफत श्रवणयंत्रांचे वाटप

मिलिंद संगई
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुख्य प्रवाहात आणणारा उपक्रम
कर्णबधीर लोकांचे जीवन त्यांच्या ऐकू न येण्यामुळे वैफल्यग्रस्त बनते. सुमारे वीस हजारांचे दोन्ही कानांचे श्रवणयंत्र व पाच हजारांचे इतर साहित्य असे मिळून पंचवीस हजारांचा हा  सेट मोफत मिळाल्यानंतर कर्णबधीरांना जेव्हा ऐकू यायला लागते, तेव्हा त्यांच्या चेह-यावर फुलणारा आनंद औरच असतो. छोट्याशा शारिरीक व्याधीमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले लोक या उपक्रमामुळे मुख्य प्रवाहात येतात. त्या मुळे या उपक्रमाचे महत्व वेगळे आहे. 

बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या मदतीने व विद्या प्रतिष्ठानच्या सहकार्याने कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप होणार आहे. शुक्रवारी (ता. 29) विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ही श्रवणयंत्रे गरजूंना दिली जाणार आहेत. 
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्षा वनिता बनकर, विजय काणेकर, युवकचे अध्यक्ष राहुल वाबळे, नितीन सातव, सचिन पवार आदींनी ही माहिती दिली. 

सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातील 1100, त्यानंतर 2015 मध्ये पुण्यात 1000 व बारामतीत 500 श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 2016 मध्ये अप्पासाहेब पवार  सभागृहात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते 1500 विद्यार्थी व नागरिकांना या यंत्राचे वाटप केले गेले.

गेल्या तीन वर्षांपासून स्टार्की फाऊंडेशनचे तज्ज्ञ तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व स्थानिक संस्थांच्या सहाय्याने हा उपक्रम राबविला जात आहे. शुक्रवारी होणा-या पहिल्या टप्प्यात ज्यांचे पूर्वी मोजमाप झालेले आहे अशा 700 ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे दिली जाणार आहेत. दुस-या टप्प्यात आणखी 1200 जणांना याचा लाभ दिला जाणार असून त्या साठीची नावनोंदणी कसब्यातील राष्ट्रवादी भवन येथे सुरु असल्याचे संभाजी होळकर यांनी सांगितले. 

 

Web Title: pune news baramati free hearing machines to deaf