बारामतीत 'हिट अँड रन' : भरधाव गाडीच्या धडकेत दोन मुलींचा मृत्यू

विजय मोरे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

आज सकाळी अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात या मुली निघाल्या होत्या. पुणे बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या पजेरो गाडीने समोरून धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 

बारामती : शिवसेनेच्या बारामती शहरप्रमुखाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यामध्ये दोन्ही मुलींचा जागेवरच मृत्यू झाला. येथील बारामती - मोरगाव रस्त्यावर कऱ्हा वागज नजीक ही घटना घडली. पजेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन्ही शाळकरी मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला. संतप्त जमावाने ही गाडी पेटवून दिली. 

समीक्षा मनोज विटकर (वय 12) व विद्या ज्ञानेश्वर पवार ( वय 13) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. दोन्ही मुली कऱ्हा वागजनजीक लष्कर वस्ती (ता. बारामती) येथील रहिवासी होत्या. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात या मुली निघाल्या होत्या. पुणे बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या पजेरो गाडीने समोरून धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 

गाडीचा मालक पप्पू माने हाच गाडी चालवत होता असे सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर शिवसेनेचा बारामती शहरप्रमुख असलेला पप्पू माने फरारी झाला आहे. अपघातानंतर येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. झालेल्या ग्रामसथांनी ही गाडी पेटवून दिली. गाडी परत नेण्यासाठी आलेल्या एका इसमालाही संतप्त जमावाने चोप दिला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. 

 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news baramati morgaon accident two girls killed