आर्थिक बचत ही काळाची गरज - जोशी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - ""आर्थिक बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी पंचविशीपासूनच गुंतवणुकीचा विचार करावा. त्यासाठी म्युचअल फंड हा चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोईस्कर आहे,'' असा सल्ला "रिलायन्स निप्पॉन लाइफ ऍसेट मॅनेजमेंट लि'चे चीफ सर्व्हिस डिलिव्हरी अँड ऑपरेशन्स एक्‍सलन्स ऑफिसर भालचंद्र जोशी यांनी दिला. 

पुणे - ""आर्थिक बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी पंचविशीपासूनच गुंतवणुकीचा विचार करावा. त्यासाठी म्युचअल फंड हा चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोईस्कर आहे,'' असा सल्ला "रिलायन्स निप्पॉन लाइफ ऍसेट मॅनेजमेंट लि'चे चीफ सर्व्हिस डिलिव्हरी अँड ऑपरेशन्स एक्‍सलन्स ऑफिसर भालचंद्र जोशी यांनी दिला. 

"रिलायन्स म्युच्युअल फंड' आणि "सकाळ माध्यम समूहा'ने शनिवारी आयोजित केलेल्या "स्मार्ट इन्व्हेस्टर' या कार्यशाळेत ते बोलत होते. म्युच्युअल फंडाचा फायदा, गुंतवणूक कशी करावी, त्यातून मिळणारा परतावा, अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. जोशी यांच्यासह सर्टिफाइड पर्सनल फायनान्शिअल प्लॅनर दिनेश रघुनाथ कोठावडे यांनीही गुंतवणूकदारांना माहिती दिली. गुंतवणूकदारांच्या प्रश्‍नांना जोशी, कोठावडे यांच्यासह भूषण वाणी आणि उदय काणे यांनीही उत्तरे दिली. 

जोशी म्हणाले, ""अगदी शंभर रुपयांपासूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सोय आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. प्रत्येक स्कीमच्या धोरणानुसार, मुदतीनुसार गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. महिन्याच्या खर्च वेगळा करून उरलेली रक्कम फंडमध्ये गुंतवू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत अधिक परतावा मिळवून देणारी; तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा अधिक स्थिर, सुरक्षित आणि सुटसुटीत असते. फक्त पैसे गुंतवताना मार्गदर्शक सल्ला घ्यावा. वेळप्रसंगी गुंतवणूकदारांनी मार्केट रिस्कही गृहीत धरायला हवी.'' 

कोठावडे म्हणाले, ""म्युच्युअल फंडाचे आर्थिक व्यवहार हे संगणकीकृत झाल्याने फंडाच्या आर्थिक व्यवहारात अधिक पारदर्शकता आली आहे. त्याशिवाय मोबाईल ऍप्लिकेशनमुळे फंडाचे व्यवहार अधिक सुलभ आणि सुटसुटीत झाले आहेत.'' रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. 

पारंपरिक बचतीचे आणि आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय आता बदलले आहेत. नव्या पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड सगळ्यात प्रभावी पर्याय आहे. लाभ चांगले मिळत असल्याने भविष्याच्या दृष्टीने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. 
- भालचंद्र जोशी, चीफ सर्व्हिस डिलिव्हरी अँ ऑपरेशन्स एक्‍सलन्स ऑफिसर, रिलायन्स निप्पॉन लाइफ ऍसेट मॅनेजमेंट लि. 

Web Title: pune news bhalchandra joshi