बोगस शिक्षणसंस्थांचा शोध घेण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे - राज्यातील बोगस शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांचा सुळसुळाट रोखण्यासाठी उच्च शिक्षण विभाग पावले उचलणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संशयित संस्था आणि विद्यापीठांचा शोध घेण्याचा आदेश जारी केले जाणार आहेत. 
मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातही मान्यता नसलेल्या शिक्षणसंस्था आहेत.

सासवड परिसरातही एक बनावट विद्यापीठ चालविले जात असल्याचे उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पाहणीत निष्पन्न झाले होते. या प्रकारांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याने उच्च शिक्षण संचालनालयाने त्याची दखल घेतली आहे. या संस्थांचा शोध घेण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.

उच्च शिक्षण संचालनालयातील सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की बोगस पदव्यांचे प्रकार मुंबई, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत उघडकीस आले आहेत. या शिक्षण संस्थांना सरकारची कोणतीच मान्यता नसते. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होते. त्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. राज्यातील अशा बनावट संस्था, विद्यापीठे शोधण्यासाठी विभागीय सहसंचालकांना सूचित केले जाणार आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा संस्थांची माहिती मागविण्यात येईल.

बनावट पदव्या देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात असल्याने त्यांच्यामध्ये जागृती करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक आवाहन केले जाणार आहे. त्यात मान्यताप्राप्त, नॅक मूल्यांकन मिळालेल्या खात्रीशीर संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचे तसेच बनावट पदव्या तसेच पदविका वाटणाऱ्या संस्था, बनावट विद्यापीठे आढळल्यास त्याविषयी विभागीय सहसंचालकांकडे माहिती वा तक्रार देण्याचे आवाहन केले जाणार आहे.
- डॉ. मोहन खताळ, सहसंचालक,  उच्च शिक्षण संचालनालय

Web Title: pune news bogus education organisation searching