Pune News : खडकवासला येथे पुन्हा घरफोडी,घरात चावी मिळाल्याने चोरट्यांनी नवीन कारही नेली

चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे
pune news
pune news sakal

किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकटवाडी या भागात बंद सदनिका फोडून चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. खडकवासला येथील कोल्हेवाडी भागात काल चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून चोरी केली,शिवाय घरात चावी मिळाल्याने पार्किंगमध्ये उभी असलेली नवीन कारही चोरट्यांनी नेली असल्याची घटना घडली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीसांसमोर उभे राहिले आहे .

मुळचे छत्तीसगढ येथील रहिवासी असलेले दमेंद्र साहू हे मागील वर्षभरापासून लष्करी संस्थेत प्रशिक्षणासाठी पुण्यात आलेले आहेत. खडकवासला येथील कोल्हेवाडी भागात असलेल्या युथिका एनक्लेव्ह या सोसायटीत त्यांनी घर भाड्याने घेतलेले आहे.

चार दिवसांपूर्वी ते घरगुती कामानिमित्त मुळ गावी छत्तीसगढ येथे गेले होते. आज सकाळी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना साहू यांच्या घराचे दार तुटलेले दिसले. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या.

pune news
Pune News : प्लॉट, प्लिंथ सोसायट्यांचा पुनर्विकास शक्य

सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत फोन करुन साहू यांना कळविले. साहू यांनी शेजाऱ्यांना टेबलावर ठेवलेली कारची चावी व पार्किंगमध्ये उभी केलेली कार आहे का हे पाहण्यास सांगितले तेव्हा चावी व कार दिसून आली नाही. सोसायटीतील रहिवाशांनी हवेली पोलीस ठाण्याला फोन करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला.

pune news
Nagpur News : आरोपीला पोलिस ठाण्यात व्हीआयपी सेवा, बालिकेचे ४ वर्षांपासून करीत होता शोषण

परंतु फोन उचलला जात नव्हता. शेवटी 112 या नंबरवर फोन करून चोरीची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या चोरीच्या घटनेत सोन्याचे दागिने व कार असा सुमारे दहा ते पंधरा लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

pune news
Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''

"चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी चेक पोस्ट उभारून रात्रीची गस्त सुधारण्यात येणार आहे. गुन्हेगारांना पकडणे आणि चोरीच्या मालाची जास्तीत जास्त वसुली करणे हे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे." अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com