पारंपरिक खेळांमध्ये रमले चिमुकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पुणे - भोवरा, काचबांगड्या, सागरगोट्या यांसारखे पारंपरिक खेळ, पंडित नेहरूंच्या वेशातील बालकलाकार, योगा, सूर्यनमस्कार, लाफ्टर थेरपी अशा विविध उपक्रमयुक्त बाल आनंद जत्रेची अनुभूती चिमुकल्यांनी घेतली.      

पुणे - भोवरा, काचबांगड्या, सागरगोट्या यांसारखे पारंपरिक खेळ, पंडित नेहरूंच्या वेशातील बालकलाकार, योगा, सूर्यनमस्कार, लाफ्टर थेरपी अशा विविध उपक्रमयुक्त बाल आनंद जत्रेची अनुभूती चिमुकल्यांनी घेतली.      

बालदिनाचे औचित्य साधून, गीता परिवार आणि निरंजन सेवाभावी संस्था यांच्यावतीने आयोजित केलेल्या जत्रेमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसह शहरातील अनाथ आणि विशेष मुलांनी सहभाग घेतला होता. परिवाराच्या अध्यक्ष संतोषी मुंदडा, सचिव श्‍याम मणियार, खजिनदार व्यास वल्लभ, संगीता मणियार, अंजली तापडीया, शुभांगी जाजू, निर्मला गांधी, वृंदा देशपांडे, तृप्ती खंडेलवाल, संजना शहा, चित्रा बेलूरे, सिद्धी सोमाणी उपस्थित होते.

संपूर्ण दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात विविध संस्थांमधील २०० मुले सहभागी झाली होती. स्वच्छता व संस्कार, प्रज्ञा संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास यांसह अनेक विषयांवर मुलांशी संवाद साधून, प्रात्यक्षिकांद्वारे त्यांना सहभागी करून घेण्यात आले.

Web Title: pune news children games

टॅग्स