चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय डॉग शो संपन्न

ज्ञानेश्वर भंडारे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

वाल्हेकरवाडी : चिंचवडमध्ये १०८ व १०९ वा आंतरराष्ट्रीय ‘ऑल ब्रीड चम्पिअन डॉग शो’ संपन्न झाला. या शो चे आयोजन पुना केंनेल कॉन्फेडेरेशन यांनी केले होते. या डॉग शो मुळे शहर वासियांना ३० ते ३५ प्रजातींचे श्वान पाहण्याची संधी मिळाली व श्वान प्रेमींनी याचा आनंद लुटला. आज (ता.२९) सकाळी अकरा वाजल्यापासून वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मध्ये हा शो सुरु झाला.

यामध्ये भारतातील विविध भागातून आलेल्या व विदेश्यातील प्रजातींची ओळख करून घेण्याकरिता व पाहण्याकरिता श्वानप्रेमीनी गर्दी केली होती.या वर्षी जर्मन शेफर्ड, बुलडॉग,हस्की,ब्रस्ट हौड, अशा ३० ते ३५ जातीच्या २८४ श्वानाची नोंद झाली होती, त्यापैकी २७० श्वानाचा प्रत्यक्ष शो झाला. श्वानाच्या वेगवेगळ्या वयोगटानुसार त्यांचे ग्रुप पाडण्यात आले होते. यामध्ये श्वानाची उंची, मान, पाठ व इतर अवयव निट आहेत का, त्यांचे संगोपन चांगले होत आहे का इ. बाबींचा विचार करून व प्रशिक्षकांनी निवडलेल्या श्वानाची निवड अंतिम फेरीत करून त्यांच्या आरोग्यानुसार त्यांचे क्रमांक काढण्यात आले. यामध्ये एकूण १० ग्रुप पाडण्यात आले होते.

या शो चे वैशिष्ट्य म्हणजे फिलिपिन्स येथील डॉ. ओरलीनो होसाका, गुडगाव ये थील भरत शर्मा, दिल्ली येथील अंजली वैद्य असे आंतरराष्टीय पातळीचे  तज्ञ प्रशिक्षक, परीक्षक व डॉक्टर्स व श्वानप्रेमी यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे आयोजन पुना केंनेल कॉन्फेडेरेशन यांनी केले होते. या कार्यक्रमाला  अध्यक्ष संजय देसाई,सचिव एन.एस पटवर्धन, कोषाध्यक्ष नंदकुमार जेठानी, आर. अकुलवार, संजीवनी पांडे आदी उपस्थित होते.  

Web Title: pune news chinchwad dog show