पुण्यात थंडीचा कडाका वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे - पुण्यासह मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता असून, विदर्भात बुधवारी (ता. १५) तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने रविवारी व्यक्त केला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

संपूर्ण विदर्भात आणि पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांत किमान तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा आणि उर्वरित मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात किंचित घट झाली, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविले आहे. 

विदर्भाच्या काही भागांसह देशात उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकातील काही ठिकाणी थंडी वाढली आहे. येथील तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही तुरळक भागांसह तेलंगण, सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश येथील किमान तापमान १.६ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.  उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत आहे. त्यामुळे तेथे धुक्‍याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांमध्ये हे धुके आणखी दाट होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

आतापर्यंतचे नीचांकी तापमान
शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार आहे. शहरात किमान तापमानाचा पारा ३.२ अंश सेल्सिअसने कमी होऊन ११.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला आहे. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे हे नीचांकी तापमान आहे. दोन दिवसांमध्ये किमान तापमान १२ तर शनिवारपर्यंत (ता. १८) ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होईल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

Web Title: pune news cold growth in pune