
पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला पब वाल्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राजा बहाद्दूर मिलमधील ‘डी मोरा’ पबमध्ये रविवारी रात्री फ्रेशर पार्टीदरम्यान अक्षरशः रणांगणाचे दृश्य पाहायला मिळाले.