कॉंग्रेसमधील निवडणुका गुंडाळण्याचे धोरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - कॉंग्रेस पक्षसंघटनेतील विविध पदांच्या निवडणुका गुंडाळण्याचे धोरण पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी रविवारी घेतल्याचे स्पष्ट झाले. ब्लॉक अध्यक्ष आणि प्रदेश प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करून त्यांची नावे प्रदेश समितीकडे पाठविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. एवढेच नव्हे, पक्षाच्या शहर पातळीवरील निवडणुकीचे म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांचे अधिकार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर सोपवून ही स्थानिक नेतृत्व मोकळे राहणे पसंत करीत आहे. 

शहरातील पक्षाचे दहा ब्लॉक अध्यक्ष आणि प्रदेश प्रतिनिधींची निवडणूक येत्या 25 सप्टेंबरपर्यंत घेण्याचा आदेश प्रदेश नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना दिला होता; परंतु निवडणुकीसाठी आठवडाभराचा अवधी राहिला असतानाही स्थानिक नेत्यांकडून निवडणुकीची तयारी झाली नाही. त्यातच, फारसा गाजावाजा न करताच या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले; तसेच कल्पना न देता निवडणूक घेण्यात असल्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्याबाबतचे वृत्त 

रविवारी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून पक्षातर्गंत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची चर्चा करून एकमताने निवड केली जाईल. त्यानंतर दहा ब्लॉक अध्यक्ष आणि प्रदेश प्रतिनिधींची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. तो मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. 

पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, रोहित टिळक, कमल व्यवहारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

बागवे म्हणाले, ""पक्षसंघटनेच्या निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार ब्लॉक अध्यक्ष प्रदेश प्रतिनिधींची नावे सर्वांनुमते निश्‍चित करण्यात येणार आहेत. मात्र, ही निवडणुकीचीच प्रक्रिया असेल. त्यावर सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये प्रदेश समितीला यादी दिली जाईल.'' 

दुसरीकडे, प्रदेश समितीकडे नावे पाठविण्याचा निर्णय म्हणजे, निवडणुका नव्हे तर, त्या नियुक्‍त्या असतील. पक्षाच्या घटनेप्रमाणे निवडणुका झाल्याच पाहिजेत, अशी मागणी पक्षाचे प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांनी केली. याबाबत त्यांना पक्षाला पत्रही दिले आहे.

Web Title: pune news congress