कॉंग्रेस हा कुटुंबकेंद्रित पक्ष - फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - ""कॉंग्रेस हा एका कुटुंबाभोवती केंद्रित झालेला पक्ष असून, त्याला कोणतीही विचारसरणी नाही. देशामध्ये "गरिबी हटाव'चा नारा अनेक वर्षांपूर्वी देण्यात आला; पण त्यातून फक्त मंत्र्यांची गरिबी दूर झाली, सामान्य माणसाची नाही. दुसरीकडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या "व्यक्ती जन्माने श्रेष्ठ नाही, कर्माने श्रेष्ठ आहे' आणि समाजातल्या सर्वांत वंचित व्यक्तीचा उदय म्हणजे अंत्योदयाच्या विचारातून भारतीय जनता पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यानंतर देशात पहिल्यांदाच गरिबांच्या कल्याणाचा "अजेंडा' राबविला जात आहे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

"रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, कार्यकारी संचालक रवींद्र साठे आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ""तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार पं. उपाध्याय यांचे विचार आचरणातही आणत आहे. सगळे परिवर्तन एका दिवसात होत नाही. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात केंद्रातील नरेंद्र मोदी यांनी मोहीम उघडली आहे. राज्यात फक्त 43 टक्के कुटुंबांपुरती शौचालयांची उपलब्धता होती, ती आता जवळपास 82 टक्के कुटुंबांपर्यंत पोचविण्यात गेल्या दोन वर्षांत यश आले आहे.'' 

येत्या दोन ऑक्‍टोबरपर्यंत राज्याचा शहरी भाग हा हागणदारीमुक्त (ओडीएफ) होईल. केवळ दोन वर्षांत चाळीस लाख शौचालये ग्रामीण भागात बांधण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. अंत्योदयाच्या प्रेरणेतून हे काम करू शकलो आहे. गरीब कल्याण योजनांच्या अंमलबजावणीतूनही पहिल्यांदाचा देशाचा जीडीपी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. साठे यांनी सूत्रसंचालन केले. सहस्रबुद्धे यांनी स्वागत केले. गोगावले यांनी आभार मानले. 

Web Title: pune news congress BJP devendra fadnavis