"इंदू सरकार' प्रदर्शित करू नका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पुणे - ""स्वर्गीय इंदिरा गांधी या कॉंग्रेस पक्षाच्या व देशाच्या आदरणीय नेत्या होत्या. त्यांच्यावर सिनेमाचा विषय घेण्याअगोदर निर्माता- दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेतली नाही. सिनेमाची संहिता कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनेका गांधी यांना दाखविली नाही. या चित्रपटात इंदिरा गांधी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी बदनामीकारक दृश्‍य अथवा संवाद असेल, तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. कॉंग्रेसजणांच्या भावना लक्षात घेऊन हा चित्रपट प्रदर्शित करू नये,'' असा सज्जड दम कॉंग्रेसने थिएटर मालक संघटनेला आज भरला. 

"इंदू सरकार' हा हिंदी सिनेमा 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील दृश्‍यांवर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे निर्माते मधुर भांडारकर यांना सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील 14 दृश्‍ये काढून टाकून चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यानंतरही कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी थिएटर मालक संघटनेस आज निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे, ""भांडारकर हे काही इतिहासकार नाहीत. त्यांनी या सिनेमाची निर्मिती पैसे कमाविण्यासाठीच केली आहे. त्यामुळे त्यांनी आधी आम्हाला चित्रफीत दाखवावी, त्याचे मूल्यमापन आम्ही करू. रामगोपाल वर्मा यांनी "सरकार' चित्रपट प्रदर्शनाआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दाखविला, अवधूत गुप्ते यांनी "झेंडा' चित्रपट राज ठाकरे यांना दाखविला. जे बाह्या वर सारतात, त्यांच्यापुढे चित्रपटवाले गुडघे टेकतात आणि आम्ही गांधीजींच्या विचारांनी आंदोलन करतो म्हणून आम्हाला निर्मात्याची साधी भेटही मिळत नाही. पोलिस खातेही त्यांनाच संरक्षण देते. हा कोणता न्याय? कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित करू नका, कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्या.'' 

पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनाही त्यांनी निवेदन दिले असून, चित्रपटगृहासमोर निदर्शने करण्याची परवानगी मागितली आहे. 

Web Title: pune news congress indu sarkar movie