चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा हात धरून "तू माझ्यावर प्रेम करशील का?' अशी विचारणा करणाऱ्याला विनयभंगाच्या खटल्यास सामोरे जावे लागले. न्यायालयाने त्याची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली. या दोन वर्षात त्याने गैरवर्तन केले तर त्याला पाच वर्ष शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले. 

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हा गुन्हा घडला होता. या प्रकरणी 17 वर्षाच्या मुलीच्या आईने तक्रार दिली होती. ही मुलगी महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला थांबवून तिचा हात धरला आपण लग्न करू, तू माझ्यावर प्रेम करशील का, मी तुला सुखात ठेवीन, असा संवाद तिच्याशी केला होता. ही मुलगी सतरा वर्षाची असल्याने आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. या कायद्यानुसार आरोपीविरुद्ध खटला चालविला गेला. न्यायालयाने आरोपीचे वय लक्षात घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार त्याला सुधारण्याची संधी दिली. तीन हजार रुपयांच्या हमीवर त्याची सुटका केली. 

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली होती. प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात प्रेम असले तरी प्रियकराने प्रेयसीच्या इच्छेविरुद्ध हात धरला तर विनयभंगाचा गुन्हा होतो. या प्रकरणी न्यायालयाने संबंधिताला तीन महिने कैद आणि पाचशे रुपये दंड ठोठावला होता असा संदर्भ त्यांनी न्यायालयात दिला होता. 

Web Title: pune news court