तरुणांना लुबाडणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पुणे - परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ही टोळी दिल्लीच्या मयूर विहार येथील कॉल सेंटरमधून तरुणांना लुबाडत असल्याचे उघडकीस आले आहे. 

पुणे - परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ही टोळी दिल्लीच्या मयूर विहार येथील कॉल सेंटरमधून तरुणांना लुबाडत असल्याचे उघडकीस आले आहे. 

अंकित सतीशकुमार सेहगल (वय 27, रा. जगतपुरी, दिल्ली), चंदनकुमार महेंद्र सहा (वय 26, रा. मयूर विहार, दिल्ली) आणि उमेश विजयकुमार (वय 30, रा. जीडी कॉलनी, मयूर विहार, दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड परिसरातील तरुणाला एका ग्रुपच्या जॉब पोर्टलवरून फोन आला. वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून तरुणाला कतार येथे दर महिन्याला 16 लाख रुपये वेतनाची नोकरी देतो, असे सांगून सिक्‍युरिटी डिपॉजिट, कागदपत्रांच्या पडताळणीच्या नावाखाली एक लाख 26 हजार रुपये भरावयास लावले. मात्र, पैसे भरूनही नोकरीचा कॉल अथवा मुलाखतीसाठी बोलावले नाही. याबाबत तरुणाने सायबर गुन्हे शाखेत तक्रार दिली होती. तसेच नऱ्हे येथील तरुणालाही अशाच प्रकारे 18 हजार रुपयांना फसविल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, कर्मचारी किरण अब्दागिरे, अमित अवचरे, शिरीष गावडे, शीतल वानखेडे, राहुल हंडाळ यांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. तेथील लक्ष्मीनगरमधील कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, सिमकार्ड, डेबिट कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले आहे. 

Web Title: pune news crime