मच्छीमाराच्या वेशात लपलेल्या फरारी गुन्हेगारांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - तरुणाचा खून करून दहा महिन्यांपासून फरारी असलेल्या दोन सराइतांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. हे दोन्ही गुन्हेगार अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर मच्छीमाराचे काम करीत होते, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी दिली. 

दिनेश मारुती धावडे (वय 27) आणि मनोज चंद्रकांत शिर्के (वय 27, दोघे रा. कालिदास घुले चाळ, बोपखेल) अशी अटक केलेल्या सराइतांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भोसरी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी 22 ऑक्‍टोबर रोजी अर्जुन वसंत देवकर (वय 27) याचा खून करण्यात आला होता. घुले आणि देवकर टोळीतील पूर्ववैमन्यातून हा खून झाला होता. या गुन्ह्यात खडक पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर युनिट एककडून मुख्य सूत्रधार शशिकांत घुले याला अटक करण्यात आली; तर, अमर शिंदे याला गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सिंधुदुर्ग, खडकवासला, लोणावळा परिसरात धावडे आणि शिर्के यांचा शोध घेतला. मात्र, ते हाती लागत नव्हते. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर गुन्ह्यांतील फरारी गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी सराईत गुन्हेगारांच्या मागावर आहेत. दरम्यान, ते दोघे आरोपी अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर राहत असून, मच्छिमाराच्या वेशात राहत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी गजानन सोनुने आणि उमेश काटे यांना मिळाली. त्यावरून भोसले-पाटील यांच्या पथकातील सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, सहायक उपनिरीक्षक राजाराम सुर्वे, हवालदार प्रकाश लोखंडे, सुधीर माने, प्रशांत गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी आरोपींना सापळा रचून अटक केली. 

Web Title: pune news crime