खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे - लोहियानगर येथे रविवारी मध्यरात्री पूर्व वैमनस्यातून एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

आरोपींमध्ये एका सराइताचा समावेश आहे. याप्रकरणी विकास कांबळे (रा. लोहियानगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रसाद सुरेश शिंदे, अजिंक्‍य सुरेश शिंदे, अजय अनिल महापुरे, केदार सुरेश शिंदे (चौघे रा. लोहियानगर) यांना अटक केली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र रविवारी रात्री दहाच्या सुमारास लोहियानगर येथील एका मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. तेव्हा आरोपी तेथे आले. आरोपींनी फिर्यादीला बोलण्याचा बहाणा करून बाजूला नेले. तेथे त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. फिर्यादीच्या मित्र या वेळी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्यांनाही धमकाविले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर तलवारीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: pune news crime

टॅग्स