नागरिकांना लुबाडणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - पत्ता विचारण्याच्या तसेच, दारू पिल्याचा बहाणा करून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीतील तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अखेर अटक केली. सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्यांची उकल करीत आरोपींकडून 11 गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी दिली. 

आकाश बाळू धुमाळ (वय 20, रा. रामोशी आळी, हडपसर), रोहन बलराम जाधव (वय 22, रा. हिंगणेमळा, हडपसर) आणि अक्षय भारत कंटाळे ऊर्फ जगताप (वय 23, रा. महादेवनगर, मांजरी) अशी त्या तरुणांची नावे आहेत. नागरिकांच्या खिशातून पैसे काढताना या तिघांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

शहरातील मार्केट यार्डसह अन्य काही भागात गेल्या तीन महिन्यांत नागरिकांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या होत्या. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मार्केट यार्डचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी पथक नेमले होते. या पथकाने त्या घटनांच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला. 

पोलिस कर्मचारी बी. एम. मुसळे आणि एस. पी. पोळेकर यांनी कोंढवा-बिबवेवाडी रस्त्यावर एका मॉलजवळ सापळा रचला. बिबवेवाडी येथील मुन्ना जयस्वाल ही व्यक्‍ती पायी जात होती. त्या वेळी आरोपींनी त्या व्यक्‍तीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून पॅंटच्या खिशातून पैसे घेऊन जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर, उपायुक्‍त डॉ. मुंढे आणि सहायक आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक होनराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

मौजमजेसाठी चोरी 
तिघे आरोपी हे मित्र असून, मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. रोहन हा बी. कॉम पदवीधारक असून, आकाश आणि अक्षय हे दोघे बारावी उत्तीर्ण आहेत. केवळ मौजमजा करण्यासाठी "इझी मनी' मिळविण्याच्या उद्देशाने ते चोरी करीत असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले. 

Web Title: pune news crime