जयपूरच्या सैराट प्रेमीयुगुलाला पुण्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - राजस्थानच्या जयपूरमधून पुण्यात पळून आलेल्या प्रेमीयुगुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्याच दत्तवाडी परिसरातील जनता वसाहतीमध्ये हे प्रेमीयुगुल लपून बसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सूरज भानसिंह (वय 19, रा. रेनवाल, जयपूर) आणि अल्पवयीन मुलगी हे दोघे गेल्या एक महिन्यापासून फरारी होते. दोघांच्या आई-वडिलांनी त्यांचा मुंबई, दिल्ली, आसामच्या गुवाहाटी शहरात बराच शोध घेतला. विविध रेल्वे स्थानकांवर त्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. 

दरम्यान, पोलिस नाईक इरफान मोमीन यांना ही सैराट जोडी पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावर युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या पथकाने त्या प्रेमीयुगुलाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी ही बाब जयपूर येथील चौमू पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना कळविली. तेथून महिला पोलिस उपनिरीक्षक इंदू शर्मा आणि कर्मचारी जगदीश सिंह तातडीने पुण्यात दाखल झाले. गुन्हे शाखेने या प्रेमीयुगुलाला जयपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

Web Title: pune news crime