अवैध गावठी दारू, ताडीसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

पुणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या हद्दीमध्ये अवैध गावठी दारू आणि ताडीसाठा जप्त करण्यात आला आहे. दापोडीत ५५ हजारांची ताडी; तर कात्रज येथे ३ लाख ७७ हजार रुपये किमतीची ५२५ लिटर गावठी दारूचे बॅरल, असा एकूण चार लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दापोडी सिद्धार्थनगरमध्ये बंदअवस्थेतील सरकारमान्य ताडी विक्री केंद्राच्या आत अवैधरीत्या गावठी दारू आणि ताडीविक्री केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी भरारी पथकाला मिळाली. यानुसार केलेल्या कारवाईमध्ये गावठी दारूचे ११६ प्लॅस्टिक पिशव्यांचे फुगे आणि २०० लिटर ताडीचा एक बॅरल व दुचाकी जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत ५५ हजार ९१० इतकी आहे. याप्रकरणी आरोपी सोनू अशोक गायकवाड (वय ३२, रा. राजीव गांधी वसाहत, गुरव पिंपळे) याला अटक केली असून, मूळ जागा व वाहनमालक रामू मलय्या साठे फरार आहे. ही कारवाई पिंपरी पथकाकडून करण्यात आली. यात निरीक्षक विनय शिर्के, उपनिरीक्षक सूरज दाबेराव, रासकर, डी. डी. माने, रवी लोखंडे, सूरज घुले, समीर बिराजे यांचा समावेश होता.

दुसऱ्या कारवाईत शुक्रवारी रात्री एक वाजता कात्रज चौकामध्ये गस्त घालताना एका चारचाकीमध्ये ३५ लिटर क्षमतेचे १५ कॅन अशी एकूण ५२५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. यात वाहनचालक दशरथ अंबाराम प्रजापती याला अटक करण्यात आली. कात्रजच्या कारवाई पथकामध्ये निरीक्षक एस. आर. पाकेरे, बी. बी. खडके, विकास थोरात, राहुल मोडक, सागर दुर्वे, संजय गोरे, सुनील कोकणे यांचा समावेश होता. दोन्ही कारवाया विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे, सुनील फुलपगार, पी. एस. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

Web Title: pune news crime Illegal seized liquor seized