Pune News : ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून ललित पाटीलवर उपचार

गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सव्वादोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते.
lalit patil
lalit patilEsakal

पुणे -अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव राठोड यांच्याकडून उपचार सुरू असल्याची बाब वैद्यकीय नोंदीवरून समोर आली आहे. या वैद्यकीय नोंदी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सव्वादोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ललितच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांकडून ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या ललितच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. परंतु दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी ललित ससूनमधून पसार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केली.

दरम्यान, ससूनमध्ये ललितवर नेमके कोणते उपचार सुरू होते, याबाबत पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. पोलिसांनी वॉर्ड क्रमांक १६ मधील कैद्यांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या नोंदी ताब्यात घेतल्या आहेत. ललितला मूत्रपिंडाचा विकार (हर्निया) होता. त्याच्यावर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर उपचार करीत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com