एक कोटीच्या जुन्या नोटा फर्ग्युसन रस्ता परिसरात जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात आलेल्या एका वृद्ध महिलेसह तिच्या सहकाऱ्यास डेक्कन पोलिसांनी गुरुवारी रात्री सापळा रचून पकडले. रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

गीता शहा (वय 70) आणि शैलेश चव्हाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावर जुन्या नोटा बदलण्यासाठी रिक्षातून दोघे येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना शहा यांच्या बॅगेत एक कोटी रुपयांच्या  जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्यात पंचावन्न लाख रुपये किमतीच्या 500 च्या आणि 45 लाखांच्या एक हजाराच्या नोटांचा समावेश आहे. 

शहा या येरवडा परिसरात राहात असून, त्यांचा "रिअल इस्टेट'चा व्यवसाय आहे. तर, चव्हाण हा गणेश पेठेतील रहिवासी असून, त्याचे चपलांचे दुकान असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर, कर्मचारी विजय अडकमोल, संदीप साबळे यांनी ही कारवाई केली. शहा व चव्हाण यांची पुढील चौकशी सुरू असून, त्यांच्याजवळील जुन्या नोटांबाबतची माहिती प्राप्तिकर विभागास कळविण्यात आली आहे.

Web Title: pune news crime Old notes seized