बहुतांश गुन्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत घट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षभरात 110 जणांचा खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या 163 घटना घडल्या. मात्र, यापैकी जवळपास सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच, सन 2016च्या तुलनेत गतवर्षी बहुतांश गंभीर गुन्ह्यांत घट झाली असून, गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाणही चांगले असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिली. 

सन 2017 मधील गुन्ह्यांबाबत माहिती देताना शुक्‍ला म्हणाल्या, ""वाहनचोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली असून, घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीला जात असून, गतवर्षी शहरातून तीन हजार 196 वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोरीचे प्रमाण वाढले असून, ते उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच, महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. या प्रकारचे सुमारे सातशे गुन्हे घडले असून, त्यात सहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील बालिकेचा खून, कोथरूड भागातील व्यावसायिकाचे अपहरण, निगडी येथील मुलाचे अपहरण यांसह गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीतील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तसेच, मार्केट यार्ड येथील घरफोडीसह अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. व्यावसायिकाच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील लुभ्या ऊर्फ संतोष चांदिलकर, घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरराजा यांच्यासह अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आणि चांगल्या "टीमवर्क'मुळेच हे शक्‍य झाल्याचे शुक्‍ला यांनी सांगितले.

Web Title: pune news crimes are lower than last year Rashmi Shukla