पुणे: कंटेनर लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात यश

decoit gang
decoit gang

लोणी काळभोर : नगर-कल्याण महामार्गावरील आने घाटात तंबाखू व मशेरीच्या बॅगा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सहा दिवसात यश आले असुन, पोलिसांनी या टोळीचा प्रमुख महिपाल पोनमाराम बिष्णोई (वय- 18, रा. खांलुब्रे ता. ता. खेड, मुळ कोजा जि. बाढनेर, राजस्थान) याच्यासह नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. या टोळीतील तीन आरोपी फऱार होण्यात यशस्वी झाले असुन, चोरीस गेलेला सुमारे दहा लाखांचा ऐवज व कंटेनर लुटण्यासाठी वापरलेली स्कॉपिओ पोलिसांनी जप्त केली आहे.
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महिपाल बिष्णोई याच्यासह ओमप्रकाश बिरमानाम गोदारा (वय - २३, रा. खुलांब्रे, महादेव ट्रेडिंग कंपनी, तळेगाव रोड, ता. खेड, मुळ रा. चितरडी, पनोरीया, ता. चोहटन, जि. बाढमेर (राजस्थान)), रघुनाथराम खियाराम तेतरवाल (वय - २४), रमेशकुमार जगराम तेतरवाल (वय - २०, दोघेही रा. खुलांब्रे, मुळ रा. नेडीनाडी, ता. दोरीमना, जि. बाढमेर), अनिल उर्फ रमेश सोहनलाल मांजू (वय - २२,  रा. खुलांब्रे, मुळ रा. शिवमंदीर, ता. दोरीमना), धीरजकुमार बाबुलाल ढाका (वय - २३, रा. खुलांब्रे, मुळ रा. गुनेशानीयो किडानी, ता. घोरीमन्ना, जि. बाढमेर), गणपतराम द्वारकाराम गोदारा (वय - १८, रा. आंबेगाव, ता. हवेली, मुळ रा. पनोरीया, ता. शेडवा, जि. बाढमेर), दिनेश हनुमानराम कालीयाणा (वय - २१, रा. आंबेगाव, ता. हवेली, मुळ रा. बांड, ता. गुडामलानी, जि. बाढमेर), दयाशंकर फुलचंद द्विवेदी (वय - २८, रा. खुलांब्रे, पंडित पवार चाळ, ता. खेड, मुळ रा. बाबूपुरा, पो.नावर, जि. गॅलोन (उत्तरप्रदेश))
यांना ताब्यात घेतले आहे. वरील आरोपींच्याकडुन स्काप्रिओ, एक मोटारसाकल व चोरलेला दहा लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावरील आने घाटातुन तंबाखू व मशेरीच्या बॅगा घेऊन जाणाऱ्या कंटेनर सहा दिवसापुर्वी स्कॉपिओ गाडीतुन आलेल्या तेरा जनांनी पिस्तुलचा धाक दाखवुन लुटला होता. कंटेनरमधील माल चोरट्यांनी काढुन घेऊन, मोकला कंटेनर सनसवाडी परीसरातील एका पेट्रोल पंपालमोर सोडुन दिला होता. कंटेनर लुटणाऱ्या टोळीने वापरलेल्या स्काप्रिओ गाडीला नंबरप्लेट नसल्याने, या गुन्हाचा तपास करणे पोलिसांच्या समोरील आव्हान होते. पोलिस अधिक्षक सुवेज हक यांनी घडलेल्या गुन्हाची व्याप्ती लक्षात घेऊन, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख दयानंद गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांना गुन्हाचा छडा लावण्याच्या सुचना केला होत्या. या सुचनेच्या आधारे गावडे व त्यांचे सहकारी सहायय्क पोलिस निरीक्षक गणेश क्षिरसागर यांनी या गुन्यावर लक्ष केंद्रितच केले होते. दरम्यान गणेश क्षिरसागर, सहाय्यक फौजदार दत्तात्रेय गिरीमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खांलुब्रे, तळेगाव परीसरातील तंबाकु व मशेरी विक्रेत्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता, खांलुब्रे येथील महादेव ट्रेंडीग कंपनीच्या दुकानात पांढऱ्या स्काप्रिओ गाडीतुन कांही जण खरेदीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिपाल बिष्णोई याच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. यात पोलिसांनी बिष्णोई याच्याकडे गुजरात व राजस्थानमधुन येणाऱ्या कांही गुन्हेगारी स्वरुपाचे तरणांची येजा असल्याची माहिती मिळाली. 

दरम्यान दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षिरसागर, निळकंठ जगता3प, सहाय्यक फोजदार गिरीमकर, विजय पाटील , महेश गायकवाड, निलेश कदम, रौफ इनामदार, विद्याधर निस्छित, मोरेश्वर इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी खांलुब्रे परीसरात साफला रचला. यात वरील नऊ जण स्काप्रिओ व एका मोटारसायकलसह अलगत सापडले. वरील नऊही जऩांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवुन सखोल चौकशी केली असता, आने घाटात कंटेनर लुटल्याची कबुली दिली. वरील नऊ जनांना ताब्यात घेत असतांना, त्यांचे आनखी तीन साथीदार फरार होण्यास यशस्वी ठरले. वरील तिघांच्या अटकेसाठी पोलिस रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com