पुणे शहरात डेंगीच्या रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

आठवड्यात 33 जणांना लागण; 104 संशयित
पुणे - शहरातील डेंगीचा ताप वेगाने वाढत आहे. या आठवड्यात 33 रुग्णांना डेंगीचे निदान झाले असून, याचा संशय असलेले 104 रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

आठवड्यात 33 जणांना लागण; 104 संशयित
पुणे - शहरातील डेंगीचा ताप वेगाने वाढत आहे. या आठवड्यात 33 रुग्णांना डेंगीचे निदान झाले असून, याचा संशय असलेले 104 रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

शहरात गेल्या महिन्यात पडलेल्या दमदार पावसाचे पाणी सोसायट्यांच्या परिसरात, मोकळ्या मैदानात पडलेल्या नारळाच्या करवंट्यांमध्ये साचते. त्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. हे डास चावल्याने शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहराच्या सर्व भागांत डेंगीचा हा ताप वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले आहे.

सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यात साचलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. रुग्णालये, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंगीचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत साडेचार हजार नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

...असा वाढला डेंगी
महिना ................ डेंगीचे रुग्ण .......... डेंगीचे संशयित रुग्ण

जानेवारी ............... 8 .................. 19
फेब्रुवारी ............... 2 .................. 16
मार्च ................... 4 .................. 28
एप्रिल .................. 5 ................... 25
मे ...................... 3 .................. 28
जून ..................... 6 .................... 58
जुलै ................... 58 ................... 228
3 ऑगस्टपर्यंत ...... 33 .................. 104
(स्रोत ः आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

Web Title: pune news dengue patient increase in city