‘खरा लाभार्थी सापडत नाही’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे - राज्यातील भाजप सरकारने जाहीर केलेल्या एकाही योजनेचा खरा लाभार्थी सापडत नाही हे सरकारचे दुर्दैव आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातबाजीसंदर्भात पत्रकारांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी राज्य सरकार अपयशी असल्याचे नमूद केले.

राज्य सरकारकडून सध्या ‘मी लाभार्थी’ ही जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. या जाहिरातीमधील व्यक्तींना लाभ मिळाला की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर मुंडे म्हणाले, ‘‘पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्याला जो फायदा झाला तो आघाडी सरकारच्या कालावधीत राबविलेल्या योजनांचा झाला आहे. पुण्यातील आणखी एक महिलेला नागरी सुविधा केंद्रामुळे रोजगार मिळाला, असा दावा केला जात असला तरी या महिलेला पहिले केंद्र हे आघाडी सरकारच्या कालावधीत दिले गेले होते. नाशिक येथील महिलेच्या बाबतीतही हाच प्रकार झाला आहे. आघाडी सरकारने ज्या योजना राबविल्या त्याचेच लाभार्थी जाहिरातीमध्ये दिसतात. या सरकारने त्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खरा लाभार्थी मिळत नाही हे त्यांचे दुर्दैव आणि अपयश आहे.’’

Web Title: pune news Dhananjay Munde