ढोल-ताशा स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने, ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या ‘रांका ज्वेलर्स’ प्रायोजित पॉवर्डबाय टायझर ढोल-ताशा स्पर्धेच्या नावनोंदणीला पथकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट असून, त्याद्वारे मोठ्या रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी पथकांना मिळणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने श्री गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ढोल-ताशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी वादन आणि ग्रामीण ढंगाचे वादन (ढोल- ताशा- झांज- खेळ) अशा दोन स्वतंत्र गटांत या स्पर्धा होणार आहेत. 

दोन्ही गटांतील विजेत्यांना स्वतंत्र पारितोषिके दिली जातील. या स्पर्धेत प्रत्येक संघाला एकूण ३० चर्मवाद्ये स्पर्धेत उतरवता येतील. यात झांज, ध्वज यांची संख्या गृहीत धरली जाणार नाही. संघात जास्तीत जास्त ५० जण असले पाहिजेत. स्पर्धेत उतरणाऱ्या संघांना टोल वापरता येणार नाही. प्रत्येक संघाला वादनासाठी १५ मिनिटे दिली जातील. 

१५ मिनिटांपेक्षा जास्त वादन केल्यास निगेटिव्ह मार्किंग केले 
जाईल. तसेच, दिलेल्या संख्येपेक्षा जास्त वाद्ये किंवा व्यक्ती असतील तरीही संघ निगेटिव्ह गुणांसाठी पात्र राहील. ढोल- ताशा- झांज गटात (ग्रामीण शैली) वादनशैली आणि सादर केले जाणारे खेळ यांच्यावर गुण दिले जातील. केवळ वादनशैलीवरच गुण अवलंबून राहणार आहेत. या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ढोल- ताशा रसिकांना मोफत पाहता येतील. त्यासाठीच्या प्रवेशिका रविवार (ता. ६) पासून सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) आणि महालक्ष्मी लॉन्स, एरंडवणे येथे सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत उपलब्ध राहतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या प्रवेशिकांचे वितरण केले जाईल. स्पर्धा पाहण्यासाठी प्रवेशिका आवश्‍यक आहेत. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या एरंडवण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेसाठीचे अर्ज ‘सकाळ’ कार्यालयात (बुधवार पेठ) उपलब्ध आहेत. 

एक लाखाचे पारितोषिक
स्पर्धेत खालीलप्रमाणे पारितोषिके दिली जाणार आहेत. ढोल- ताशा पथक प्रथम पारितोषिक - १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक - ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक - ५० हजार रुपये. ढोल- ताशा- झांज पथक प्रथम पारितोषिक - १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक - ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक - ५० हजार रुपये. 

‘रांका ज्वेलर्स प्रायोजित पॉवर्डबाय टायझर ढोल- ताशा स्पर्धा’          प्राथमिक फेरी - ९ ऑगस्टपासून, महालक्ष्मी लॉन्स, पुणे 

प्रवेशिकांसाठी संपर्क 
हृषीकेश मुकनाक - ९५५२११८७१० (‘सकाळ’ - बुधवार पेठ कार्यालय) 
स्पर्धेबाबतच्या अन्य तपशिलासाठी संपर्क  
विनायक बावडेकर ९६८९९११०८६ किंवा अमित गोळवलकर ९८८१०९९००५ (सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत)

Web Title: pune news dhol-tasha competition