ढोल-ताशांचा आजपासून घुमणार आव्वाज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने, ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या ‘रांका ज्वेलर्स’ प्रायोजित पॉवर्डबाय टायझर ढोल-ताशा स्पर्धेचा आव्वाज बुधवारपासून (ता. ९) घुमणार आहे. तरुणाईचा सळसळता उत्साह अन्‌ वादनाचा वेगळा माहोल रंगविण्यासाठी ढोल-ताशा पथके सज्ज झाली आहेत. शहरी वादनाच्या ठेक्‍याला ग्रामीण ढंगाच्या वादनाची जोड मिळणार असून, या महोत्सवात ढोल-ताशा-झांज पथकांच्या वादनाने वेगळाच रंग अनुभवायला मिळणार आहे.

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने, ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने घेण्यात येणाऱ्या ‘रांका ज्वेलर्स’ प्रायोजित पॉवर्डबाय टायझर ढोल-ताशा स्पर्धेचा आव्वाज बुधवारपासून (ता. ९) घुमणार आहे. तरुणाईचा सळसळता उत्साह अन्‌ वादनाचा वेगळा माहोल रंगविण्यासाठी ढोल-ताशा पथके सज्ज झाली आहेत. शहरी वादनाच्या ठेक्‍याला ग्रामीण ढंगाच्या वादनाची जोड मिळणार असून, या महोत्सवात ढोल-ताशा-झांज पथकांच्या वादनाने वेगळाच रंग अनुभवायला मिळणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे श्री गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त या तीन दिवसीय ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत ढोल-ताशा (शहरी वादन) आणि ढोल-ताशा-झांज (ग्रामीण ढंग) पथकांचे वादन होणार आहे. नाशिक ढोल पथकांचा समावेश शहरी वादन गटात आहे. तसेच, अंतिम फेरीसाठी ढोल-ताशा पथकांमधून सहा पथकांची निवड होईल आणि ढोल-ताशा-झांज पथकातून चार पथकांची निवड होईल. 

स्पर्धेतील प्राथमिक फेरीची सोडत मंगळवारी काढण्यात आली. ‘रांका ज्वेलर्स’चे संचालक वस्तुपाल रांका, श्रेयस रांका, ‘टायझर’चे संचालक कुणाल मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, ‘सकाळ’चे संचालक (ऑपरेशन्स) भाऊसाहेब पाटील, ‘सकाळ’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. तिन्ही दिवस कोणती पथके आपला वादन जल्लोष सादर करणार आहेत याचे वेळापत्रक या वेळी जाहीर करण्यात आले. 

बुधवारी (ता. ९) वादन करणारी ढोल-ताशा पथकांची नावे 
१) तरुण गणेश मंडळ
२) शिवनेरी वाद्यपथक
३) जय श्रीराम ढोल-ताशा पथक
४) शंभूगर्जना ढोल-ताशा पथक
५) हनुमान तरुण मंडळ
६) शिवप्रताप वाद्यपथक
७) शिवदिग्विजय ढोल-ताशा पथक

गुरुवारी (ता. १०) वादन करणारी ढोल-ताशा पथकांची नावे 
१) समाधान ढोल-ताशा पथक
२) श्री सुधर्मा ढोल-ताशा पथक
३) धुरंधर प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक
४) मानिनी ढोल-ताशा पथक
५) शिवसाम्राज्य वाद्यपथक
६) शिवाज्ञा ढोल-ताशा पथक
७) मानाजी बाग ढोल-झांज पथक
८) कल्याण पूर्व बासरीवाला आधुनिक ढोल-ताशा पथक

शुक्रवारी (ता. ११) वादन करणारी ढोल-ताशा पथकांची नावे
१) शंभूराजे प्रतिष्ठान
२) श्री दत्त मंदिर ढोल-लेझीम पथक
३) जयनाथ ढोल-ताशा पथक
४) ढोनू आई मित्रमंडळ
५) शिवतांडव पारंपरिक ढोल-ताशा पथक
६) ऐतिहासिक वाद्यपथक
७) शिवयोद्धा वाद्यपथक
८) आरंभ ढोल-ताशा पथक

कर्वे रस्त्यावरील (राजाराम पुलाजवळ) महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत ‘सकाळ ढोल-ताशा स्पर्धा’ होणार आहे. 
स्पर्धेत सहभागी झालेली पथके प्रत्येकी पंधरा मिनिटे वादन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजल्यापासून वादनाला सुरवात होईल. 
गिरीश सरदेशपांडे, महेश मोळवडे आणि साहेबराव जाधव हे स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी १७ ऑगस्टला होणार आहे. 

ढोल-ताशा हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. त्यामुळे ढोल-ताशा आणि गणेशोत्सव याचा एक वेगळाच बंध जोडला गेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असून, या स्पर्धेच्या निमित्ताने ढोल-ताशाचा आव्वाज पुण्यात घुमणार आहे. ढोल-ताशा वादनातील एक वेगळाच नाद आपल्याला यातून दिसेल. रांका ज्वेलर्स नेहमीच सांस्कृतिकता जपण्याला भर देत आला आहे. ही स्पर्धा त्याचाच एक भाग आहे.
- वस्तुपाल आणि श्रेयस रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

ढोल-ताशा वादनातून ध्वनी प्रदूषण होते ही साफ चुकीची गोष्ट आहे. ढोल-ताशा हा आपल्या परंपरेचा व संस्कृतीचा अविभाज्य घटक असून, त्याच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. या स्पर्धेत ठेक्‍याचा गजर पुणेकरांना ऐकायला मिळणार आहेच. पण, ढोल-ताशा वादनातील विविधांगी पैलूही लोकांसमोर येतील याची खात्री वाटते.
- कुणाल मराठे, संचालक, टायझर

डीजे आणि आधुनिक संगीत प्रणालीमुळे आपण पारंपरिक वाद्यांना विसरलो आहोत. आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या ढोल-ताशावर आपण टीका करतो. पण, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यातून आपल्या देशातील वैभव व परंपरा टिकून आहे. म्हणून ‘सकाळ’ची ही ढोल-ताशा स्पर्धा सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम करेल असा विश्‍वास वाटतो.
- सुशील जाधव,  विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

Web Title: pune news dhol-tasha competition